मदत कोल्हापूरकरांना!

कोल्हापूर सांगलीत महापुराने थैमान घातला होता त्यावेळी उदार अकोलेकरांच्या मदतीने जनसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून दुर्लक्षित कुरुंदवाड या लहानशा गावी जिथे पुराचा सर्वात जास्त फटका बसला अशा ठिकाणी तेथील स्थानिक सहकाऱ्यांच्या मार्फत 300 कुटुंबांना 1 महिना पुरेल असे किराणा किट ,शुद्ध पाणी व मेडिसिन्स अगदी हातोहात पोहचवण्यात आले त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच सर्व काही सांगून जात होता.. जनसेवाच्या या नियोजनबद्ध कार्याचे सर्वच समाजस्तरातून कौतुक करण्यात आले.

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा!

जनसेवा फाऊंडेशन च्या माध्यमातून अकोले तालुक्यातील तरुणाईच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा या हेतूने तालुक्यात अहमदनगर जिल्ह्यातील मानाची समजली जाणारी अकोले चषक कबड्डी स्पर्धा सुरू करून ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाते. जनसेवा फाऊंडेशनच्या या उपक्रमात राज्यभरातून संघ सहभागी होतात व तालुक्यातील नागरिकांना उत्कृष्ट खेळाची पर्वणी उपलब्ध होते. कबड्डी सोबत नेहरू युवा केंद्राच्या vollyball ,मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करून तालुक्यातील खेळाडूंना प्लॅटफॉर्म देण्याचे काम फाऊंडेशन मार्फत केले जाते..

बीजगोळे लागवड अभियान!

जनसेवा फाऊंडेशन अकोलेच्या🌿 माध्यमातून आज दुसऱ्या टप्प्यात 5000 वृक्ष, बीजगोळे आणि बियांचे रोपण गर्दणी ठिकाणी करण्यात आले लवकरच मोर्चेवाडी येथे उर्वरित वृक्षांची लागवड करून 10000 वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण करण्यात येणार आहे.

छायाचित्रण स्पर्धा

जनसेवा फाऊंडेशन तर्फे lockdown मध्ये छायाचित्रण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

( दि.१८-२६ जुन)

स्पर्धेत १८९ स्पर्धक सहभागी झाले .ह्या स्पर्धे साठी खालील बक्षिसे ठेवण्यात  होती.

 प्रथम १००१/-  (विजेता अक्षय माने)

द्वितीय ७०१/-(विजेता ऋतिक चासकर)

तृतीय  ५०१/-(अभिराम साळवे)

​पर्यावरण पूरक गणेशोस्तव!

दरवर्षीप्रमाणे हयावर्षी (२०२०) फाऊंडेशन तर्फे शाडू मातीच्या गणपती मूर्तिची ना नफा ना तोटा ह्या 

तत्वावर विक्री करण्यात आली.

२२ लोकांना मूर्ती चे वाटप करण्यात आले

संकल्प पूर्तता!

मोर्चेवाडी परिसरात  वृक्षांची लागवड करून 10000 वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण करण्यात आला.

परिसरातून कौतुकाची थाप मिळवण्यास पात्र ठरलो!

घरपोच किराणा वाटप

अकोले शहरात कोरोना संक्रमणाच्या काळात' IPC 144 अंतर्गत जमावबंदी लागू असल्याने लोकांना दैनंदिन वापरायच्या गोष्टी मिळणे अवघड झाले होते यावर आम्ही एक पाऊल उचलत घरपोच किराणा वाटप सुरू केले.

आम्ही 90 कुटुंबांपर्यंत पोहचून त्यांना किराणा घरपोच  पोहचवण्यात यशस्वी ठरलो!

​भव्य रक्तदान शिबीर!

कोरोंनाच्या काळात रक्ताचा तुटवडा भासत असताना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. ह्याला दाद देत आम्ही तालुक्यात रक्तदान शिबीर घेतले.

​१०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले!

-:NOTICE:-

​सभासदांनी आपले ओळखपत्र आमच्या कार्यालयातून गोळा करावे.

  • Instagram
  • YouTube