10000 वृक्ष लागवडीचा संकल्प
जनसेवा फाऊंडेशन अकोलेच्या🌿 माध्यमातून आज दुसऱ्या टप्प्यात 5000 वृक्ष, बीजगोळे आणि बियांचे रोपण मोर्चेवाडी या ठिकाणी करण्यात आले लवकरच विरगाव येथे उर्वरित वृक्षांची लागवड करून 10000 वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण करण्यात येणार आहे.
कोल्हापूर सांगलीत महापुराने थैमान घातला होता त्यावेळी उदार अकोलेकरांच्या मदतीने जनसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून दुर्लक्षित कुरुंदवाड या लहानशा गावी जिथे पुराचा सर्वात जास्त फटका बसला अशा ठिकाणी तेथील स्थानिक सहकाऱ्यांच्या मार्फत 300 कुटुंबांना 1 महिना पुरेल असे किराणा किट ,शुद्ध पाणी व मेडिसिन्स अगदी हातोहात पोहचवण्यात आले त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच सर्व काही सांगून जात होता..
जनसेवाच्या या नियोजनबद्ध कार्याचे सर्वच समाजस्तरातून कौतुक करण्यात आले.
जनसेवा फाऊंडेशन च्या माध्यमातून अकोले तालुक्यातील तरुणाईच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा या हेतूने तालुक्यात अहमदनगर जिल्ह्यातील मानाची समजली जाणारी अकोले चषक कबड्डी स्पर्धा सुरू करून ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाते. जनसेवा फाऊंडेशनच्या या उपक्रमात राज्यभरातून संघ सहभागी होतात व तालुक्यातील नागरिकांना उत्कृष्ट खेळाची पर्वणी उपलब्ध होते. कबड्डी सोबत नेहरू युवा केंद्राच्या vollyball ,मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करून तालुक्यातील खेळाडूंना प्लॅटफॉर्म देण्याचे काम फाऊंडेशन मार्फत केले जाते..