तुमच्या मदतीने आम्ही साकारत आहोत अकोले शहरात एक भव्य
' AByaaisaka "
नमस्कार मित्रांनो आणि वाचकांनो! जसे की आपण सर्व' जाणता सध्या बेरोजगारीने तिच्या चरण सीमा गाठल्या आहेत.
भारताचा सध्याचा बेरोजगारीचा दर २०१८ च्या सर्वेक्षणांनुसार २.८% राहिला आहे.आणि हा आकडा २०२० मध्ये उच्चांकीत ८.८७% झाला आहे.
युवकांना सशक्त बनवून कौशल्य वृद्धिंगत करण्याची नितांत गरज आहे. तालुक्यातील किती तरी युवक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी तालुका सोडून मोठ्या मोठ्या शहरात गेलेले आपल्याला दिसतात. यावर तोडगा काढण्यासाठी आपल्याच तालुक्यात एक उत्तम अभ्यासिका चालू करण्यासाठी आम्ही पाऊले उचलली आहेत. जेणेकरून तालुकयातील बहुसंख्य युवक तालुक्यात राहूनच उत्तम दर्जाचा अभ्यास करून भरघोस यश संपादन करू शकतील.
गरीब विद्यार्थी ज्यांना पुस्तके उपलब्ध होत नाहीत त्यांना नक्कीच ह्या अभ्यासिकेच्या ग्रंथालयामुळे मोठा हातभार लागेल.
आम्हाला हे कार्य करताना आपले सहकार्य लागणार आहे.
चला अकोले तालुका "अधिकारी तालुका" बनवूया
तुम्ही तुमचे योगदान असे देऊ शकता.
तुमच्या जवळील द्यान दान करून!
तुमच्या घरी नक्कीच पुस्तके असतील जी तुम्ही वाचून तुमच्या कपबर्ड मध्ये ठेवली असतील. ती पुस्तके तुम्ही अभ्यासिकेच्या ग्रंथालयासाठी देवू
शकता. आमच्याकडून तुम्हाला एक पावती मिळेल
ती दाखवून अभ्यासिकेत उपलब्ध असलेली कोणतीपण ईतर पुस्तके तुम्ही वाचायला नेवू शकता.
अभ्यासिकेसाठी फर्निचर
गरज भागवून!
मित्रांनो तुमच्या घरी अडगळीला पडलेली काही टेबल खुर्ची कपाट नक्की असेलच! आम्हाला संपर्क साधा आम्ही तिचा योग्य वापरात आणून दुरुस्ती करून अभ्यासिकेत ठेवू शकतो. तूमची अडगळीची वस्तु कोणासाठी तरी यशाची खुर्ची ठरू शकते.
डिजिटल अभ्यासिकेसाठी आपले हात पुढे करून!
मित्रांनो तुमच्या घरात कदाचित जुना एखादा मॉनिटर किवा CPU नक्की असेल. तो कितीतरी दिवस बाजूला पडलेला आहे तो आम्हाला द्या आम्ही त्यावर काम करून त्याच्या सहाय्याने तालुक्यातील एखाद्या गरीब घरातील मुलाची संगणक शिकण्याची ओढ पूर्ण करू शकू!
थोडेफार पैसे देऊन!
चांगल्या कामात नक्कीच भरपूर हात पुढे येतात!
ह्या बाबतीत आपले नागरिक कायम सढळ हाताने
मदत करतात !
आणि हो ,ह्या सर्व उपक्रमाचे "public Audit" केल जाईल सर्व जमाखर्च प्रकाशित केला जाईल .शेवटी तुम्ही दिलेल्या पैसा कुठे गेला हे जाणून घेण्याचा तुमचा पण हक्क आहे
काम प्रगतिपथावर!
आपली बहूमूल्य मदत देण्यासाठी खाली संपर्क करा!
9689757322
8380850057
चि. शुभम जाधव
चि. श्रेयस भांगरे
8888876001
चि. देवेंद्र आभाळे
तुम्ही आम्हाला भेटून सुद्धा तुमची मदत करू शकता!
जनसेवा फाऊंडेशन कार्यालय,
कस्तुरी साडी सेंटर जवळ,अकोले ४२२६०१
To Donate anonymously UPI on:
8888876001
OR
UPI ID : 9579464108@ybl
तुमची आजची छोटीशी मदत कदाचित उद्या कोणाचे तरी
भविष्य बदलवू शकते!
नक्की विचार करा!