एकविसाव्या शतकात मानवाने सर्वच क्षेत्रात अनेक शोध लावले आहेत. शरीरात कृत्रिम अवयव बसविले जातात. परंतु कृत्रिम रक्त तयार करण्याचे तंत्र मानवाने अद्याप आत्मसात केलेले नाही. मानव रक्तावर प्रकिया करतो, त्याचे विघटन करू शकतो, परंतु प्रत्यक्षात रक्त तयार करू शकत नाही. त्यामुळे मानवी रक्ताला पर्याय सापडलेला नाही. मानवी रक्त फक्त मानवी शरीरातच तयार होते. म्हणून रक्तदान हे श्रेष्ठदान आहे.
यावर्षी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा अत्यंत तुटवडा भासत आहे तरी आपण रक्तदान करून सत्कार्य करावे
रक्तदान करायला जायचंय पण गर्दी होऊ द्यायची नाहीये, म्हणून रजिस्ट्रेशन करा!
